सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

म्युच्युअल फंड - गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय "म्युच्युअल फंड" २१ व्या शतकातील गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे कारण

15 Nov 2018 By श्री. महेश चव्हाण
1505 4 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

आपण शेअर बाजारातील सरळ गुंतवणूक आणि म्युच्युअल फंड यातील फरक पहिला. म्युच्युअल फंडबद्दल बेसिक माहिती घेतली आज आपण म्युच्युअल फंड  हा २१ व्या शतकातील गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय का आणि कसा आहे ते पाहणार आहोत.

आज काळानुसार जो बदलतो त्याला स्मार्ट म्हटले जाते आणि जो नाही बदलत त्याला आऊटडेटेड म्हटले जाते. बदलेल्या राहणीमानामुळे किंवा उंचावलेल्या जीवनशैलीमुळे आपण आज स्वतःला स्मार्ट समजत आहोत आणि दिवसेंदिवस आपण अजून कशा प्रकारे आपले जीवनमान उंचावू शकतो याकडे लक्ष देतो. गेल्या काही वर्षात आपल्याकडे झालेले बदल पाहा.

• घरात एक फोन ऐवजी आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे 
• घरातील Color TV ऐवजी आता LED किंवा Smart TV आहे 
• घरामध्ये Air fresheners / Hand Sanitizers असे नवीन प्रोडक्ट आले.

 
हे सर्व का सांगतोय असे तुम्हाला वाटत असेल पण एक सांगा आज आपण आपल्या गुंतवणुकीच्या पद्धतीत बदल केले का? नाही ना ? अजूनही आपण

• Fixed Deposit
• Post RD 
• Insurance Policy 
• Gold 


या ठरलेल्या पर्यायांमध्येच पैसे गुंतवतोय पण कधी नवीन गुंतवणुकीचा पर्याय म्हणून शेअर बाजार गुंतवणूक किंवा म्युच्युअल फंडचा विषय आला की आपण नकारार्थी मान हलवतो. मला काही यातले जमणार नाही, मला म्युच्युअल फंडमध्ये कसे गुंतवायचे कळत नाही. आणि मग सगळीकडे स्वतःला स्मार्ट समजणारे आपण इथे परंपरागत चाललेल्या पर्यायांमध्ये आपण आपला पैसा गुंतवतो. 

मला फक्त एकच सांगा, आज तुम्ही जो स्मार्टफोन वापरताय तो कसा वापरायचा कोणी शिकवले का? नाही ना? तरी पण वापरताय? कारण "If there is Will There is Way" या इंग्रजी म्हणीनुसार स्मार्टफोन वापरणे ही आपली आवड किंवा समाजातील स्टेटस होते. पण गुंतवणुकीच्या बाबतीत "जैसे थे वैसे ही रहेंगे" हा आपला दृष्टिकोन आहे. वरील परंपरागत चालत आलेल्या गुंतवणूक चुकीच्या नाहीत पण तुम्हाला स्मार्ट परतावा मिळणार नाही कारण वाढलेली महागाई त्यातला मोठा भाग काढून घेईल. म्हणून काळानुसार ज्याप्रमाणे आपण राहणीमान उंचावले त्याप्रमाणे आता गुंतवणुकीची ही पद्धत उंचावली पाहिजे हो ना ?

म्युच्युअल फंड २१ व्या शतकातील गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय का आणि कसा ते पाहणार आहोत.

1. Professional Management (व्यावसायिक व्यवस्थापन) :- म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य अनुभवी आणि कुशल व्यक्ती असतात. ज्यांच्याकडे संशोधन करण्यासाठी टीम असते जी गुंतवणूकदारांचे पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक कशी करता येईल यावर सतत लक्ष देत असते. ज्याप्रमाणे एखाद्या दूरच्या प्रवासाला जाताना आपण हवाई प्रवास किंवा रेल्वेचा प्रवास करतो आणि ते चालवणाऱ्या वाहकावर आपण विसंबून असतो त्याच प्रकारची जबाबदारी म्युच्युअल फंड मॅनेजर पार पडतात.

2. Diversification (विविधता) :- म्युच्युअल फंड मधील पैसा हा नावाप्रमाणेच एकत्रितरित्या वेगवेगळ्या विविध पर्याय मध्ये गुंतवला जातो जसे शेअर्स, बॉण्ड, सरकारी योजना किंवा कंपनी FD. ह्यामुळे गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीतली जोखीम बऱ्यापैकी कमी होते. कारण जर समजा तुम्ही एक छोटे गुंतवणूकदार आहात आणि तुम्हाला ५०००० शेअर्स मध्ये सरळ गुंतवणूक करायची असेल तर जास्तीत जास्त तुम्ही २-३ कंपन्यांमध्ये गुंतवणूक योग्यरित्या करू शकता पण जॉईंट ही जास्त असेल. पण म्युच्युअल फंडमध्ये सर्वांचा पैसा एकाच ठिकाणी असल्यामुळे तो विविध ठिकाणी गुंतवणूक करता येतो.

3. Liquidity (तरलता) :- म्युच्युअल फंड हे दीर्घकालीन गुंतवणुकीचे साधन आहे. पण त्याच बरोबर म्युच्युअल फंड मध्ये Liquidity (तरलता) खूप चांगल्या प्रकारची असते. सामान्य गुंतणूकदार जीवनात खूप वेळा अशा परिस्थितीतुन जातो की तेव्हा त्याला त्याच्या गुंतवणूक केलेली रक्कमेची गरज पडू शकते. अशा वेळेला म्युच्युअल फंड सर्वात योग्य पर्याय आहे कारण इथे Liquidity (तरलता) असल्यामुळे तुमची गुंतवणूक तिसऱ्या दिवशी तुमच्या बँक अकाउंटला जमा होते.

4. Transparency (पारदर्शकता) :- म्युच्युअल फंडमध्ये जगाच्या काना-कोपाऱ्यातून पैसा येतो आणि प्रत्येक व्यक्तीला त्याने केलेल्या गुंतवणुकीचे काय झाले किती खर्च आला? किती परतावा मिळाला याची काळजी असते. म्युच्युअल फंड हे एक असे माध्यम आहे ज्यामध्ये मोठ्या स्तरावर पारदर्शकता असते कारण सर्व व्यवहार संगणक प्रणालीवर होत असतात, प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवली जाते. त्यामुळे फसवणुकीचा धोका कमी असतो. 

5. Regulation (नियंत्रण) :- म्युच्युअल फंडमध्ये असलेली सामान्य गुंतवणूकदाराची गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने वेगेवेगळ्या पद्धतीने नियंत्रण ठेवले आहे. SEBI या शेअर बाजारसंबंधित मुख्य संस्थेने योग्य काळजी घेतली आहे त्याच बरोबर AMFI ची स्थापना खास करून नियंत्रणासाठीच केली आहे.

भारतातील काही म्युच्युअल फंड कंपन्या 

1. HDFC MF
2. ICICI MF
3. SBI MF
4. RELIANCE MF
5. BIRLA SUN LIFE
6. DSP BLACK ROCK
7. IDFC MF
8. MOTILAL OSWAL MF
9. UTI MF
10. SUNDARAM BNP

"म्युच्युअल फंड" २१ व्या शतकातील गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे कारण महागाईला मागे टाकण्याची आणि सामान्य गुंतणूकदाराला योग्य परतावा देण्याची क्षमता म्युच्युअल फंड मध्ये आहे. म्युच्युअल फंडमधील वेगवेगळ्या योजना आणि त्यातून मिळणार परतावा आपण पुढील लेखात पाहू.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

योगेश प्रभाकर on 27 Apr 2020 , 5:45PM

😅😅 खूपच सुंदर माहिती दिली आहे.....

Suhas on 28 Mar 2020 , 12:12AM

सामान्य गुंतवणूक दाराला यापेक्षा उत्तम पर्याय नाही, कारण हा पर्याय जर त्याने ठेवला नाही तर महागाईवर मात करताना खरच त्याची आजच्या वाढत्या महागाईच्या काळात दमछाक होईल

aniket on 18 Oct 2019 , 5:30PM

me a.r.n code kasa kadu.

satyam.singh on 19 Dec 2018 , 7:04PM

satyam

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...