श्री. महेश चव्हाण
जिथे जिथे उत्पन्न येणार तिथे कर म्हणजेच टॅक्स भरावा लागणारच शेअर बाजार गुंतवणूक किंवा ट्रेडिंग हा श्रीमंतीचा मार्ग असे समजून आपण यात उतरणार असू तर या श्रीमंतीच्या मार्गावर आपल्या उत्पन्नातील काही भाग आपल्याला सरकारला कर स्वरूपात द्यावा लागतो. आज आपण शेअर बाजार गुंतवणूक आणि त्यावरील कर (टॅक्स) जाणून घेणार आहोत.
जसजसा एखाद्या कंपनीचा विस्तार व विकास होतो त्याप्रमाणे तिची संपत्ती आणि नफ्यातसुद्धा वृद्धी होते. याच बरोबर तिच्या शेअरची किंमतसुद्धा वाढते. याकरिता आपण जर त्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्या कंपनीच्या शेअर्सची वाढलेली किंमत आणि आपण खरेदी केलेली किंमत यामध्ये असलेली वाढ म्हणजे प्रत्येक शेअरमागे आपण मिळवलेला नफा या नफ्यावर आपल्याला काही कर भरावा लागतो तो आपण जाणून घेऊ.
समजा एखादा शेअर आज आपण १०० रुपयाला खरेदी केला आणि आपण तो ११० ला विकला म्हणजे या व्यवहारात १० रुपये नफा झाला. या १० रूपायाच्या नफ्यातून आणि यातून ब्रोकरेज, STT, सर्विस चार्जेस आणि कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. पुढे भविष्यात आपल्याला हे सर्व हाताळायचे आहे त्यासाठी आजच शेअर बाजारातील करप्रणाली जाणून घेऊया. आज आपण शेअर्स विकून झालेला फायदा... कॅपिटल गेन टॅक्स पाहणार आहोत
कॅपिटल गेन (भांडवली नफा ) कसा मोजावा :-
समजा एखादा शेअर आज आपण १०० रुपयाला खरेदी केला आणि आपण तो ११० ला विकला म्हणजे या व्यवहारात १० रुपये नफा झाला. या १० रूपयाच्या नफ्यातून आणि यातून ब्रोकरेज, STT, सर्विस चार्जेस वजा करून कॅपिटल गेन काढला जातो.
शेअर बाजार मध्ये कॅपिटल गेन हा २ प्रकारचा असू असतो
1. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन
2. लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स
• शॉर्ट टर्म कॅपिटल गेन :- तुम्ही खरेदी केलेला शेअर जर तुम्ही १२ महिन्याच्या आत कहीहि फायद्यात विकलात तर मिळणाऱ्या फायद्याचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणतात आणि जर तोटा झाला तर शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस असे म्हणतात.
• लॉंग टर्म कॅपिटल गेन :- तुम्ही खरेदी केलेले शेअर्स जर तुम्ही १२ महिन्यानंतर म्हणजे १ वर्षानंतर विकले आणि त्यावर तुम्हाला फायदा झाला असेल तर त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असे म्हणतात तर तोटा झाला असल्यास लॉंग टर्म कॅपिटल लॉस असे म्हणतात.
शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आपण पाहूया
1. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स :- शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर टॅक्स भरावा लागतो. वर्षभराच्या खरेदी-विक्रीचा ताळेबंद काढून झालेल्या नफ्याच्या १५% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो.
2. लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स :- भारतातील नवीन गुंतवणूकदारांना शेअर बाजाराकडे आकर्षित करण्यासाठी लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स सरकारने करमुक्त म्हणजेच ठेवला आहे. म्हणजेच वर्षभरापेक्षा जास्त काळ जर शेअर्स तुमच्याकडे असतील आणि त्यामध्ये तुम्हाला फायदा होत असेल तर एक वर्षाननंतर विक्री केल्यास झालेला नफा लॉंग टर्म कॅपिटल गेन पकडला जातो. त्यावर तुम्हाला एकही रुपया भरावा लागणार नाही.
म्हणून बहुतेक गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीकडे वळतात. शेअर्स ट्रेडिंग या प्रकारामध्ये तुम्ही उतरणार असाल तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स विसरून चालणार नाही आणि दीर्घकालीन गुंतवणुकीकडे वळणार असाल तर करमुक्त फायद्याचा तुम्ही भविष्यातील नफा वाढवण्यासाठी करू शकता. पुढील लेखात आपण अजून सविस्तर पाहणार आहोत.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa