श्री. महेश चव्हाण
शेअर बाजार ट्रेडिंग : घेऊया मित्र-परिवारांचा आढावा
आपला मुलगा-मुलगी
आपला नवरा-बायको
आपला भाऊ किंवा बहीण
आपला मित्र-मैत्रीण
आपला सहकारी
शेअर बाजारात ट्रेडिंग करत असतील तर वेळ काढून त्यांच्याशी बोला.... शेअर बाजारात ट्रेडिंग करणारे नवशीखे ट्रेडर गेल्या वर्ष्यात करोडो ने बाजारात आले आहेत.... सर्वाना नफा कमवायचा आहे पण हे शक्य होते फक्त ३-५% ट्रेडर्स ना...
त्यामुळे तुमच्या अवती भवती जे कोणी ट्रेडिंग करत असतील तर त्यांना विश्वासात घेऊन खालील प्रश्न विचारा ??
● आतापर्यंत किती गुंतवणूक केलीस ??
● आतापर्यंत नेट प्रॉफिट मध्ये आहेस की लॉस मध्ये ??
● खरेदी विक्री अभ्यास करून करतो की कोणत्या टिप्स वरून ??
● यामुळे तुझी नोकरी किंवा व्यवसाय वरून लक्ष कमी झाले आहे का ??
● जो नफा कमावण्यासाठी तू हे सुरू केले होते तितका नफा तूला होतोय का ??
यामागे त्यांना कुठेही त्यांची चूक निदर्शनास आणणे नाही तर त्यांना भानावर आणण्यासाठी हे सर्व करायचे आहे. गेले १४ वर्षे या शेअर बाजारात काम करतोय.... जस जसे मार्केट तेजी मध्ये येतात मोठ्या प्रमाणावर लोक शेअर बाजारात गुंतवणूक ट्रेडिंग साठी येतात.... यावेळी हातात मोबाईल, त्यावर असलेला नेटपॅक, बँक बॅलन्स किंवा सहज उपलब्ध होणारी कर्जे... आणि त्यात लॉकडाउन यामुळे याला चांगलीच चालना मिळाली आणि रेकॉर्ड तोड डीमॅट अकाउंट ओपन झाले.
हे का सांगतोय कारण डिमॅट ट्रेडिंग करताना किती प्रॉफिट होतो किती लॉस होतो हे फक्त ट्रेडर ला स्वतःला माहिती होतो..... जेव्हा प्रॉफिट होतो तेव्हा स्क्रीनशॉट शेअर केले जातात पण तोटा होतो तेव्हा मन कशातच लागत नाही..... उद्या कधी शेअर बाजार ओपन होतोय आणि आजचा लॉस भरून काढतो म्हणून खेळाडू झोपून जातो.... तोच गडी नवा डाव दुसऱ्या दिवशी चालू होतो.... पण मार्केट कधीच आपल्याला प्रॉफिट करून द्यायला उघडत नसते.
लॉस मध्ये असल्यावर अपराधीपणाची भावना येऊन त्यांना कुणाशी शेअर करावेसे वाटत नाही. आणि यामुळेच १५-२०००० चा लॉस २-३ लाख कधी होतो कळत नाही.
यात वेळ ही जातो आणि आर्थिक नुकसान ही मोठे होते.... नुकसान भरपाई करताना कुठे थांबायचे हे माहित नसते..यासाठीच वेळ काढा आणि बोला.... नाहीतर २-४ लाख रुपयांचा लॉस कन्फर्म होणारच आहे....
गेल्याच आठवड्यात जीरोदा या कंपनी चे संस्थापक निखिल कामत यांनी आपल्या कडे असलेल्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये फक्त १% लोक FD पेक्षा जास्त रिटर्न्स मिळवू शकले आहेत..... मग इतर ९९% लोक कोणत्या कॅटेगरी मध्ये आहेत.... आणि हे लोक नक्की आहेत तर कोण तर हे तेच लोक जे आपल्या आजूबाजूला मित्र परिवार भाऊ बहीण या नात्यात आहेत. पण आजकाल हे स्वतःच्याच धुंदीत असतात... सतत मोबाईल वर सकाळी ९ वाजता एखादी क्रिकेट मॅच किंवा रामायण महाभारत सुरू व्हावे, असे ब्रश न करता, अंघोळ न करता बसून राहतात... एखादया दिवशी खूप उत्साहात असतात तर एखाद्या दिवशी खूप डिप्रेशन मध्ये असतात.
यामागे सर्व कारण हे शेअर बाजारातील ट्रेडिंग चे लागलेले व्यसन आहे आणि त्यात जर लॉस झालेला असेल तर तो ट्रेडर लॉस भरून काढण्यासाठी जीवाचा आकांडतांडव करतो... पण हाती काही लागत नाही.... लॉस वाढत जातो... आणि त्याच बरोबर नोकरी आणि व्यवसाय डी फोकस होणे वेगळे..!
यासाठीच आपल्या आजूबाजूला जे कोणी ट्रेडर असतील त्यांना विश्वासात घ्या.... आधार बना त्यांना भानावर आणायचे आहे.... कारण ओरडून ऐकेल अशी पिढी नाही आहे आता.... थोडंफार नुकसान झाले असेल तर इथेच थांबवा. योग्य मार्गदर्शन घेऊन ही पैसा कमावता येतो हे त्यांना पटवयाला हवे.
तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे असल्यास नक्की संपर्क करा.
---
धन्यवाद
महेश चव्हाण
संस्थापक - मराठी पैसा
संस्थापक - I4I Investment Services Pvt.Ltd.
9821899211
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa