सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ज कि च.....निर्णय तुमचाच विलास आज खूप खुश होता....कारण ही तसेच होते.....त्याचा पहिला पगार १५०००

01 Apr 2019 By श्री. महेश चव्हाण
564 1 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

विलास आज खूप खुश होता....कारण ही तसेच होते.....त्याचा पहिला पगार १५००० आज त्याच्या सॅलरी अकाउंट ला जमा झाला होता. आणि त्या पगारातून त्याला ४०००० चा मोबाईल फोन खरेदी करायचा होता आणि या विचाराने तो अजूनच खुश होत होता. 

नोकरी ला लागल्यापासूनच कंपनीमधील इतर मित्रांचे मोबाइल पाहून स्वतःकडे असलेल्या ७००० च्या फोनचा त्याला कमीपणा वाटू लागला होता. या महिन्याभरातच पहिल्या पगारात नवीन मोबाईल घेण्याचे त्याने ठरवले होते. त्याच्या कंपनीतील वरिष्ठ मित्र योगेश ने फायनान्स कंपन्यांच्या ०% व्याजावरील ऑफर बद्दल त्याला माहिती दिल्याने वरील पैसे जमा करण्याची अडचण ही राहिली नव्हती. महिन्याला १५००० पगार घेणारा हा आपला मित्र ४०००० चा मोबाईल फोन घेऊन महिन्याला ४००० चा हफ्ता पुढील १० महीन्यासाठी आपल्या पगारातून परतफेड करणार होता. आयुष्यातील पहिला पगार त्यातही ४०००० चा मोबाईल म्हणजे जवळपास वार्षिक मिळकतीच्या २५% टक्के रक्कम फक्त मोबाईल वर...... विचार करा ४०००० चा मोबाईल घेणे ही गोष्ट विलास चा आर्थिक आढावा पाहता योग्य आहे का???

मित्रांनो असे असंख्य विलास आज आपल्या आजूबाजूला आपण पाहतो तर कधी आपण स्वतः या विलास च्या भूमिकेत असतो. यामागचे कारण म्हणजे आपल्या जीवनातील वाढणारे "च" महत्व. जीवनात "ज आणि च" मधील फरक न समजल्याने आपण चुकीचे निर्णय घेऊन बसतो. तुम्ही म्हणाल ज आणि च म्हणजे काय तर...

ज (जरूरते) = आवश्यक

च (चाहत) = इच्छा


आज वाढलेली महागाई आणि त्यात जीवनात वाढलेले च चे (इच्छेचे) स्थान यामुळे आर्थिक जीवन जटिल होत आहे.

आजूबाजूला आपण इतरांचे जीवनमान पाहतो आणि त्यांच्यनुसार आपल्या जीवनात बदल करू पाहतो. एखादया व्यक्तीच्या जीवनात एखादी गोष्ट आवश्यक असू शकते पण ती गोष्ट आपल्यासाठी इच्छा असू शकते. त्यामुळे ज आणि च चा फरक न समजल्याने आपण घेताय ते निर्णय योग्य आहे असे आपल्याला वाटत असते. पण जीवनात इच्छा कधी कमी होत नाहीत त्या वाढतच असतात आणि त्या जितक्या आपल्या जीवनात शिरकाव करतील तितके आपले आर्थिक जीवन कोलमडून टाकतील हे खूप जणांना वेळ निघून गेल्यावर कळते.

त्यामुळे आर्थिक जीवनात निर्णय घेताना ज कि च या मंत्राचा वापर करून तुम्ही खरेदी करणारी गोष्ट तपासून पहा...जगातील श्रीमंत गुंतवणूकदार वॉरेन बफ्फेट नेहमी म्हणतात "गरज नसलेल्या वस्तू खरेदी केल्या कि गरजेच्या वस्तू विकायची वेळ येते" म्हणून जेव्हा कधी खरेदीची यादी करत असाल तेव्हा च ला म्हणजेच इच्छेला जास्तीत जास्त दूरच ठेवा.....जेणेकरून भविष्यात आर्थिक जीवन चांगल्या स्तरावर नेता येईल....हो ना...

म्हणून जरुरते कि चाहते निर्णय तुमचाच.....

***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

Harshali on 09 May 2019 , 10:50AM

gr8...

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...