सुविचार
तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .
डाउनलोड मोबाईल ॲप
मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शेअर बाजारामध्ये एक एक पाऊल सावधगतीने टाकत आपला प्रवास आज "बाय बॅक ऑफ शेअर्स" पर्यंत पोहचला आहे. नवी अर्थक्रांतीच्या फेसबुक पेजवर पोस्ट होणारे हे लेख आज खूप नवीन गुंतवणूकदारांपर्यंत पोहचत आहेत. लेख वाचून खूप जणांनी गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करण्याची इच्छा असल्याचे कॉल आणि मेसेज फेसबुक, व्हॉट्सअॅप वर येत आहेत या सर्वाना एकच सांगणे आहे, आता कुठे आपण शेअर बाजारातील एक एक पायरी चढत आहोत त्यामुळे अधीर ना होता शेअर बाजाराचा कळस गाठूया. कोणत्याही खेळाचे पूर्ण नियम माहिती असल्याशिवाय त्या खेळात उतरणे म्हणजे अपयशायची तयारी करणे. त्यामुळे घाई-घाईत काही निर्णय घेऊ नका. शेअर बाजार आयुष्यभर चालूच राहणार आहे त्यामुळे संयम ठेवा आणि स्वतःचा अभ्यास वाढवा. जेव्हा तुमचा अभ्यास परिपूर्ण असेल तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास तुमच्याकडे असेल. आज आपण "बाय बॅक ऑफ शेअर्स" म्हणजे नक्की काय ? हे पाहणार आहोत. >> बाय बॅक ऑफ शेअर्स म्हणजे काय ? सहज सोप्या भाषेत बाय बॅक ऑफ शेअर्स म्हणजे सध्याच्या शेअरहोल्डरकडे असलेल्या शेअर्सची पुनःखरेदी. जेव्हा एखाद्या कंपनीला भविष्यातील तिच्या कामगिरी बद्दल आत्मविश्वास असतो तेव्हा मार्केट मधील शेअर्स होल्डर कडे असलेले शेअर्स बाय बॅक ऑफ शेअर्सच्या माध्यमातून खरेदी केले जातात. बाय बॅक ऑफ शेअर्स हे एक सकारत्मक पाऊल आहे. >> शेअर्स होल्डरसाठी सकारत्मक की नकारात्मक ? बाय बॅक ऑफ शेअर्स हे शेअर बाजारात सकारात्मक समजले जाते कारण जेव्हा कंपनीचे प्रमोटर्स स्वतःचे शेअर्स मार्केटमधून खरेदी करायला तयार असतात तेव्हा शेअर्स होल्डर्सचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे बाय बॅक ऑफ शेअर्स हे शेअर होल्डर्स बरोबर सर्वांसाठी सकारात्मक असते >> बाय बॅक ऑफ शेअर्स चे प्रकार 1. टेंडर पद्धत 2. ओपन मार्केट पद्धत 1. टेंडर पद्धत :- ही सर्वात सोपी पद्धत आणि जास्त वापरात येणारी पद्धत आहे. टेंडर पद्धत आपण उदाहरण पाहून समजून घेऊया. समजा एका कंपनीच्या शेअरची मार्केट मधील किंमत ५०० रुपये असेल तर टेंडर पद्धतीनुसार ती कंपनी बाय बॅक ऑफ शेअर्सच्या माध्यमातून एका ठराविक किंमतीला ती समजा ५५० रुपयांना सध्याच्या शेअर्स होल्डर्सना ठराविक काळात (काही दिवस) प्रस्ताव ठेवतात. टेंडर पद्धतीमध्ये बाय बॅक ची किंमत ठरवलेली असते. 2. ओपन मार्केट पद्धत :- ओपन मार्केट पद्धतीमध्ये शेअर्सची जास्तीत जास्त किती किंमत कंपनी देऊ शकते ती किंमत ठरवली जाते आणि मग सर्वाकडून बाय बॅक ऑफ शेअर्सची ओपन ऑफर ठेवली जाते. समजा एका कंपनीच्या शेअरची मार्केट मधील किंमत ५०० रुपये असेल आणि कंपनी ने ऑफर पद्धतीने बाय बॅक ऑफ शेअर्स नुसार १००० ही जास्तीत जास्त किंमत ठरवली. म्हणजे ज्या कुणाला या बाय बॅक ऑफ शेअर्सला अर्ज करायचा आहे ते त्यानुसार किंमत ठरवून बाय बॅकचा लाभ घेऊ शकतात. १००० च्या वरील किंमतीचा ते विचार करणार नाहीत कारण ती त्यांची जास्तीत जास्त बोली असते. दोनच दिवसापूर्वी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस या भारतातील अग्रगण्य कंपनी ने टेंडर ऑफर द्वारे बाय बॅक ऑफ शेअर्सचा प्रस्ताव त्यांच्या शेअर्स होल्डर साठी ठेवला आहे. बाय बॅक ऑफ शेअर्स मध्ये भाग घेणे किंवा न घेणे हे पूर्णपणे शेअर्स होल्डरच्या मर्जीचा विषय आहे. त्यामुळे पूर्णपणे विचार करून निर्णय घ्या. *************************** तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa
तुम्ही अजून शेअर बाजार गुंतवणूकिसाठी तयार आहात का ?
शेअर बाजारात ट्रेडिंग करताय ??? लवकर भानावर या...
शेअर बाजारातून संपत्ती निर्माणात पुस्तकांचे महत्व
खूपच सुंदर अनुभव
खूपच सुंदर माहिती दिली आहे.....