श्री. महेश चव्हाण
आजकाल खूपवेळा बँकेत गेल्यावर आपल्याला बँकिंग कमी आणि इन्शुरन्स किंवा म्युचुअल फ़ंडच्या कार्यालयात आलोय का असे वाटते.
आपण कोणत्याही बँकेत जेव्हा आपल्याला विश्वास वाटतो तेव्हाच आपण तिथे अकाउंट काढतो आणि आपले बँकिंग व्यवहार त्याच्या माध्यमातून करत असतो. तुमचे हेच व्यवहार बँक ट्रॅक करत असते म्हणजे...
- तुम्ही कमावता किती....
- तुमची लाइफस्टाइल काय आहे....
- तुमचा एव्हरेज बॅलन्स किती आहे...
हे ही वेळोवेळी बँक पाहत असते. यातूनच तुम्हाला
- ही FD करा....
- ही पॉलिसी घ्या....
- आमच्या बँकेचा हा म्युचुअल फंड चांगला आहे....
- किंवा आमचा यांच्या सोबत tieup आहे...
म्हणजे काय आपल्या ग्राहकांना वेगवेगळे प्रॉडक्ट विकणे आणि कमिशन कमविणे... तसेच खूपवेळा आपण
- कार लोन...
- होम लोन...
- बिजनेस लोन...
करायला बँकेत जातो आपली सर्व माहिती घेतल्यावर मी तुम्हाला सर्व करून देतो पण तुम्हाला वार्षिक १००००० रुपयांची ही पॉलिसी करावी लागेल. आपण हसत हसत लोन होतंय या आनंदात सह्या करतो पण नंतर लक्षात येते ती पॉलिसी तुमच्या काहीच गरजेची न्हवती. आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा बँकेतील तो कर्मचारी दुसऱ्या ब्रांच मध्ये बदली झालेला असतो किंवा त्याने बँक बदलली असते.
तुमच्या कष्टाचा पैसा जोपर्यंत तुम्हाला स्वतःला पटत नाही तोपर्यंत गुंतवू नका हा नियम लक्षात ठेवा.
हॉटेल मध्ये जेवल्यावर पान खाण्यासाठी आपण पानवाल्या कडे जातो पण हॉटेल च्या गल्ल्यावर ठेवलेलं 2 दिवसांपूर्वी बनवलेले पान खात नाही तसेच आपल्या गुंतवणूक बँकेने ठरवलेल्या पॉलिसी किंवा फ़ंडात करून डोक्यावर हात मारून घेऊ नका आजची गुंतवणूक उद्याचे आपले आर्थिक जीवन ठरवते यासाठी जसे आपल्या फॅमिली चा फॅमिली डॉक्टर असतो तसा प्रत्येक फॅमिली चा गुंतवणूक सल्लागार असणे ही काळाची गरज आहे.