सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शेअर बाजाराचे सर्किट फिल्टर : भाग २ शेअर बाजाराचे सर्किट फिल्टर : भाग २

24 Nov 2018 By श्री. महेश चव्हाण
565 1 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

काल आपण शेअर बाजारातील सर्किट फिल्टर ही यंत्रणा कशा पद्धतीने काम करते ते आपण पहिले, पण कोणतीही यंत्रणा कशी चालते याची माहिती घेण्यापेक्षा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा गुंतवणूकदाराची मानसिकता नक्की कशा पद्धतीने काम करते हे पाहणे गरजेचे आहे. 

शेअर बाजार गुंतवणूक ही इतर सर्व गुंतवणुकीपेक्षा अधिक चंचल आहे. जगभरात घडणाऱ्या घटनांचा यावर परिणाम होतो त्यामुळे सेन्सेक्स उसळी घेणे किंवा सेन्सेक्स गडगडणे या गोष्टी शेअर बाजारसाठी नव्या नाहीत. या गोष्टी नव्या असतात तुमच्या सारख्या नव्या गुंतवणूकदारांना जे आपल्या कष्टाचे पैसे बाजारात लावून त्यातून काहीतरी स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा ठेवतात. सर्व नव्या गुंतवणुकदारांनी एक गोष्ट लक्षात घ्या. सेन्सेक्स जेव्हा पडतो तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की ही कायमस्वरूपी परिस्थिती आहे तर ही तात्पुरती तयार झालेली परिस्थिती असते. अशावेळेस तुमच्या गुंतवणुकीला खरी गरज असते तुमच्या निर्णयाची. गेले १० वर्षात शेअर बाजार उसळी घेणे आणि पडणे अशा खूप परिस्थिती मी पहिल्या आहेत आणि खूप चुकाही केल्या आहेत. त्या चुका तुम्ही करू नका यासाठी आतापर्यंत सेन्सेक्स च्या अशा काही मोठ्या चढ आणि उताराचच्या परिस्थिती आपण आज पाहणार आहोत.

भारतीय शेअर बाजारातील महत्वपूर्ण दिवस

भारतीय शेअर बाजारमध्ये सर्किट फिल्टर लावण्याची वेळ आतापर्यंत ४-५ वेळा आली आहे. कधी उतारामुळे तर कधी उसळीमुळे, म्हणजेच सेन्सेक्स जसा काही अघटित घडले तर पडतो तसाच तो काही सकारात्मक घडले तर उसळी ही घेतो हे लक्षात घ्या.

१. १७ मे २००४ :- सेन्सेक्स ८४२ पॉईंटने घसरला. रालोआ (NDA) सरकार पडल्यामुळे बाजारातील मोठ्या गुंतवणूकदारांनी निराशा दाखवत मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यामुळे बाजाराला सर्किट फिल्टर लावावे लागले.कोणतेही सत्ता चालवणारे सरकार जेव्हा त्यांच्या हातातून सरकार जाते आणि नवीन पक्षाचे सरकार येते तेव्हा मोठ्या प्रमाणावर बदल होतात आणि याचा परिणाम उद्योग धंद्यावरही होतो. म्हणून बहुतेक वेळेस देशातील सरकार बदलल्यास असे त्याचे पडसाद आपल्याला शेअर बाजारात पाहायला मिळतात.

२. २२ मे २००६ :- सेन्सेक्स ११११. ७० पॉईंटने घसरला होता. कारण आंतराष्ट्रीय गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या वित्तीय कर्जामध्ये झालेले बदल. खूप वेळा आपल्या देशातील बाजारावर आंतरराष्ट्रीय घडामोडीचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे बाजार एक तासासाठी बंद ठेवण्यात आला होता.

३. १७ ऑक्टोबर २००७ : सेन्सेक्समध्ये १७४३ पॉईंटची घसरण त्या दिवशी पाहायला मिळाली होती. यामागचे कारण सेबीने जाहीर केलेले पी-नोट्स बद्दल कडक धोरण हे होय.

४. २२ जानेवारी २००८ : या दिवशी जागतिक मंदीची सुरुवात झाली असे म्हणतात. अमेरिकेपासून सुरवात झालेली मंदी भारतीय बाजारापर्यंत पोहचली. २००८ हे पूर्ण वर्ष आर्थिक मंदीचे होते पण ज्यांच्याकडे चांगल्या कंपनीचे शेअर्स होते त्यांनी २-३ महिन्यातच स्थिर-स्थावर होऊन आपली क्षमता दाखून दिली

५. १८ मे २००९ :- काँग्रेस सरकारला परत एकदा भारतीय जनतेने निवडून दिले. सकाळी मार्केट ओपन होताच सेन्सेक्स ने २०% ची उसळी दाखवली. मोठ्या वित्तीय संस्था-मोठे गुंतवणूकदारांमधील सकारात्मकतेचा हा परिणाम असतो.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

योगेश प्रभाकर on 21 Apr 2020 , 8:42PM

खूपच सुंदर माहिती दिली आहे.......

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...