सुविचार
तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .
डाउनलोड मोबाईल ॲप
मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
गुंतवणूकीचे उद्देश व कालमर्यादा कशी ठरवावी हे आपण पाहिले. हे उद्देश योग्य कालावधीत पूर्ण करण्यासाठी महागाई दरानुसार लागणारी रक्कम किती? याचे सूत्र जाणून घेऊ या. यामध्ये 72 चा नियम काम करतो. 72 नियम म्हणजे काय? तो कसा काम करतो? हे पाहू या. ठराविक व्याजदराने एका ठराविक रकमेचे मूल्य दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी मोजण्यासाठी हा 72 चा नियम वापरतात. 6 टक्के दराने 1 लाख रुपयाचे दोन लाख होण्यासाठी किती कालावधी लागेल? हे 72 च्या नियमाने जाणून घेऊ या. *** 72 चा नियम *** एखाद्या रकमेची दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी = 72 ÷ वाढीचा दर 1 लाख रुपयाचे 6 टक्के दराने 2 लाख होण्यासाठी लागणारा कालावधी = 72 ÷ 6 = 12 वर्षे 1 लाख रुपयाचे 8 टक्के दराने 2 लाख होण्यासाठी लागणारा कालावधी = 72 ÷ 8 = 9 वर्षे 1 लाख रुपयाचे 9 टक्के दराने 2 लाख होण्यासाठी लागणारा कालावधी = 72 ÷ 9 = 8 वर्षे 1 लाख रुपयाचे 10 टक्के दराने 2 लाख होण्यासाठी लागणारा कालावधी = 72 ÷ 10 = 7.2 वर्षे महागाई दर हा बँकेच्या व्याजदराच्या 1 ते दीड टक्के मागेपुढे असतो. म्हणजे सध्या बँकातील व्याजाचे दर 6 ते 8 टक्के आहेत. तर महागाई दर 4.5 ते 9 टक्के इतका आहे. वेगवेगळ्या वस्तूंचा महागाई दर वेगवेगळा असतो. त्यामुळे ही दराची किमान व कमाल पातळी इथे दिली आहे. आजच्या काळात लागणारा खर्च व ठराविक कालावधी नंतर लागणारा खर्च यांचा संबंध आपण जाणून घेऊ या. आजच्या एक लाख रुपयाएवढी रक्कम म्हणजे ठराविक कालावधी नंतर किती याचे कोष्टक / सारणी / तक्ता पुढे दिला आहे. आज (2017) - चार वर्षानंतर (2021) - आठ वर्षानंतर (2025) - दहा वर्षानंतर (2027) - बारा वर्षानंतर (2029) A) महागाई दर 6 टक्के अनुक्रमे - 1.26 लाख - 1.59 लाख - 1.79 लाख - 2 लाख B) महागाई दर 8 टक्के अनुक्रमे - 1.36 लाख - 1.85 लाख - 2.15 लाख - 2.51 लाख C) महागाई दर 9 टक्के अनुक्रमे - 1.41 लाख - 2 लाख - 2.36 लाख - 2.81 लाख D) महागाई दर 10 टक्के अनुक्रमे - 1.46 लाख - 2.14 लाख - 2.59 लाख - 3.13 लाख अशा प्रकारे आपण आपल्याला लागणाऱ्या रकमेची नोंद करुन घ्यावी. *************************** तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa
तुम्ही अजून शेअर बाजार गुंतवणूकिसाठी तयार आहात का ?
दीर्घ कालीन गुंतवणूक करताना...
भांडवल बाजारासंबंधी दावे : अनुचित व्यापारी प्रथा
सर गुंतवणूकीचे अजून नियम काय आहे ते पण सांगा
mind blowing sir👍👌